क्रिकेटविश्वात खळबळ! गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी, कोणी दिली धमकी?

मुंबई : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्याला ISIS काश्मीरकडून ही धमकी मिळाली आहे. गंभीरने २३ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांकडे या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. आपल्यासह कुटुंबाला सुरक्षा मिळावी अशी मागणी त्याने केली आहे.
गंभीर सध्या आयपीएलच्या ब्रेकवर असून, काही दिवसांपूर्वीच तो युरोप दौऱ्यावर गेला होता. मात्र धमकीनंतर गंभीरने त्वरित दिल्लीत एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.
आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार असून, प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर पुन्हा आपली जबाबदारी पार पाडणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर गंभीरच्या प्रशिक्षकपदाकडे क्रिकेट चाहत्यांचे मोठे लक्ष लागले आहे.
गौतम गंभीरचाभारतीय संघासोबत २०२७ च्या वर्ल्ड कपपर्यंतचा करार आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने आयसीसी विजेतेपद पटकावलं आहे.मात्र, नुकत्याच पार पडलेल्या WTC फायनलमध्ये भारताला यश मिळू शकले नाही. त्यामुळे आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी संघ आणि प्रशिक्षक दोघांनाही मोठा कस लागणार आहे.