कुख्यात गुंड गजा मारणेचा ‘शार्प शूटर’ अखेर पोलिसांच्या ताब्यात ; पुणे पोलिसांचं मोठं यश


पुणे : विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गँगवॉरने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. अशातच
पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे टोळीतील गुंड सुनील बनसोडे याला कोथरूड पोलिसांनी मध्यरात्री वारजे माळवाडी परिसरातून ताब्यात घेतले आहे. त्यामुळे गजा मारणे टोळीला मोठा धक्का बसला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,गजा मारणे टोळीतील ‘शार्प शूटर’ म्हणून सुनील बनसोडेची ओळख आहे. मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर छापा टाकत त्याला अटक केली. अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या या गुंडाला ताब्यात घेणे, हे पुणे पोलिसांसाठी एक महत्त्वाचे यश मानले जात आहे. सुनील बनसोडे या पुण्यात कोणता प्लॅन होता का? असा सवाल देखील विचारला जात आहे. पोलीस आता सुनील बनसोडेची चौकशी करत आहेत.

दरम्यान बनसोडे याच्या विरोधात मोकासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता. अशातच काल पोलिसांनी सुनील बनसोडे याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!