डोईवर तुळशी वृंदावन, कपाळी टिळा, मुखात माऊलींचा जयघोष! मंत्री आदिती तटकरेंच्या वारीत पायी सहभागाचा साधेपणाने उरुळीकांचन ग्रामस्थ भारावले …


जयदिप जाधव उरुळीकांचन : ‘डोईवर तुळशी वृंदावन , कपाळी टिळा,’ मुखात ‘माऊली’चा नामघोष,वारीत पायी चालण्याची भक्तिची अनुभुती घेत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी उरूळी कांचन (ता.हवेली) येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेत या अनुपम सोहळ्याचा ‘याच देही याच डोळी’प्रचिती घेतली.
आषाढी वारीसाठी शासनाच्या महिला व बालकल्याण विभाग, राज्य महिला आयोग यांच्या विद्यमाने महिलांसाठी’ महिमा उन्नती वारी२०२६’ उरुळीकांचन येथे आलेल्या महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांचा सोहळ्यातील प्रवेशव साधेपणा वारकरी व ग्रामस्थांना अनुभवायला मिळाला. मंत्री अदिती तटकरे यांनी सोहळ्यातील विसावा ठिकाणी सुमारे १ किलोमीटरचे अंतर वारीत पायी चालत वैष्णवांची श्री विठ्ठलाच्या भक्तीची अनुभूती घेतली.अतिशय साधारणपणे विसावा ठिकाणी डोक्यावर तुळशीचे वृदांवन घेऊन त्यांनी कपाळी टिळा व भक्तिचा महिला वर्णवित वैष्णवांची मने जिंकत ग्रामस्थांचा नम्रपणे सत्कार स्विकारीत या उपस्थितीतांची मने जिंकली.

तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेत ज्येष्ठ मंडळींचे आर्शिवाद, तरुण व लहानग्यांची आवडीने प्रतिसाद देत त्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. आदिती तटकरे यांनी विसावा ठिकाणी ग्रामस्थांनी शुभेच्छांचा विनंतीला सहभागी होत आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना शुभेच्छा देत वारी सर्वांना आरोग्यदायी जावो अशी श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली.

दरम्यान उरुळीकांचन येथे कार्यक्रमासाठी आलेल्या आदिती तटकरे यांनी श्री बालाजी नर्सरी उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा संतोष शितोळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन सहकाऱ्यांसमवेत वारकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचा लाभ घेतला.