‘कोयत्या गँग विरोधात मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू, यामधून एकजण देखील सुटणार नाही’ – चंद्रकांत पाटील


पुणे : पुणे शहरातील अनेक भागात कोयते हातात घेऊन नागरिकांना अडवून त्यांच्याकडून पैसे घेतल्याच्या घटना समोर आल्या. या आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी आठ ते नऊ ग्रुपला अटक केली आहे.

या सर्वांवर मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. आता यामधून एकजण देखील सुटणार नाही. तसेच ज्यावेळी ४० ते ५० जणांना मोक्का लागेल, आयुष्य उध्वस्त होईल त्यावेळी इतरांना हा धडा मिळेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

तुमच्यासाठी उद्धव ठाकरे यांचे दरवाजे खुले आहेत का त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर २०१४ मध्ये युती तुटली होती. मंत्रिमंडळात शिवसेना यायला पाहिजे.हे लक्षात घेऊन मी आणि धर्मेंद्र प्रधान मातोश्रीवर ३० वेळा गेलो होतो.सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतर अनेक प्रश्नांसाठी चर्चा करण्यासाठी ३ वेळा दीड दीड तास गेलो.त्यामुळे आपल्याला जे सांगितले जाईल ते काम करायच,त्यामुळे माझ्या नेतृत्वाने मागील काही महिन्यात मातोश्रीवर जाण्याचा आदेश दिला नाही.त्यामुळे टेस्टिंग झाल नाही की, मला मातोश्रीवर प्रवेश आहे की नाही.अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!