‘द टाईम टू टाईम न्यूज’ची बातमी ठरली खरी! अखेर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्रीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; कारखान्याला भांडवल उभं करण्याचा मार्ग मोकळा…


उरुळीकांचन : हवेली तालुक्याचे वैभव असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची 99.27 एकर जमीन विक्रीला आज अखेर राज्य मंत्री मंडळाने परवानगी दिली आहे. जमीन विक्री करण्यासंदर्भातील मोठा अडथळा दूर झाल्याने कारखाना सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज मंगळवारी (ता.26) राज्यमंत्री मंडळांची बैठक पार पडली. या बैठकीत यशवंत सहकारी साखर कारखान्याला जमीन विक्रीस परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विविध विभागांचे मंत्री उपस्थित होते.

आर्थिक गर्तेत सापडलेला “यशवंत” हा मागील पंधरा वर्षापासुन बंद असुन, कारखान्यासमोरील आव्हाने खूप मोठे आहेत. “यशवंत” कारखाना मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या ताब्यात असून कारखाना सुरू करण्यासाठी राज्य सरकारची फार मोठी मदत लागणार आहे. सरकारच्या मदतीशिवाय कारखाना सुरू होण्याची अजिबात शक्यता नाही.

दरम्यान, यशवंत कारखान्याकडे असलेली बँकाची कर्जे, शेतकऱ्याची थकीत ऊसबील, कामगारांचे थकीत पगार, शासनाची विविध देणी, व्यापारी देणी व इतर देय देणी देणे. तसेच कारखान्याचा गाळप हंगाम सुरु करणे, त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करण्यासाठी कारखान्याच्या मालकीची बँकेकडे तारण असलेल्या 99.27 एकर जमिनीची विक्री कृषी उत्पन्न बाजर समिती, पुणे यांना करण्याबाबत निर्णय सभासदांनी घेतला होता. त्यानुसार 99.27 एकर जमीन 299 कोटी रुपयांना हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीला विक्री करण्याच्या प्रस्ताव मंजूर झाला होता. आता या जमीन विक्रीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. त्यामुळे यशवंत सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मंत्रिमंडळाच्या या निर्णयाबद्दल बोलताना कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप म्हणाले की, मंत्रिमंडळाने कारखान्याच्या मालकीची जमीन विक्रीस परवानगी दिल्याने, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांचाही खूप खूप आभारी आहे. वरील तिघांनीही कारखाना चालू करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच कारखान्याचे सभासद, शेतकरी व कामगार यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. कारखान्याच्या हितासाठी आमच्या पाठीमागे उभे असलेले सर्व मान्यवरांचे आभार मानतो. सध्या मुंबईत असल्याने ज्यादा बोलता येत नाही पण पुण्यात आल्यानंतर मी व संचालक मंडळ सविस्तर भूमिका मांडणार आहे.

टाईम टू टाईम न्यूजचे वृत्त ठरले खरे..

यशवंत कारखान्याच्या जमीन विक्रीला कायदेशीर मान्यता मिळावी राज्याचा सहकार व पणन विभाग हा राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन हा ठराव कायदेशीर पार पाडून यशवंत कारखान्याला पुर्नर्जिवीत करण्याचे पाऊल उचलणार म्हणजे ‘द टाईम टू न्यूज’ पोर्टलला वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानुसार आज राज्य मंत्रीमंडळ बैठकीत कारखान्याच्या जमीन विक्रीला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला कारखाना सुरू होण्याचा शब्द खरा करण्याच्या दृष्टीने पाऊले पडली आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!