जेजुरीत माजी नगरसेवक पानसरे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अखेर ताब्यात, धक्कादायक माहिती आली समोर..


जेजुरी : जेजुरीत काल एक खळबळजनक घटना घडली होती. जमिनीच्या जुन्या वादातून जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची ७ जुलैला कुऱ्हाड आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती.

हत्या करण्यात आलेली व्यक्ती सुप्रिया सुळे यांच्या जवळची असल्याचे सांगितले जात होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी घटनेनंतर पळून गेले होते. अखेर मध्यरात्री जेजुरी पोलिसांनी या आरोपींना दापोडी पुणे येथे ताब्यात घेतले.

याबाबत आता चौकशी सुरू आहे. जेजुरी धालेवाडी जवळील एका शेतात जमिनीच्या जुन्या वादातून आरोपी वणेश परदेशी, काका परदेशी, किरण परदेशी, स्वामी परदेशी आणि इतर एका व्यक्तीने मेहबूब पानसरे यांच्यावर कुऱ्हाड आणि कोयत्याने वार करून त्यांची हत्या केली होती.

यामुळे पोलीस आरोपींच्या शोधत होते. या प्रकरणातील आरोपी स्वामी परदेशी व किरण परदेशी यांना आधीच जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

तसेच दोन मुख्य आरोपी फरार झाले होते. फरार झालेल्या दोघा मुख्य आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली होती. आता त्यांच्याकडून पोलीस माहिती घेत आहेत.

पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दापोडी पुणे येथे पहाटे चार वाजता मुख्य आरोपी वनेश परदेशी व काका परदेशी यांना ताब्यात घेतले. या दोघा आरोपींना सासवड न्यायालयात दाखल केले आहे.

आरोपींना 12 तारखे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे जेजुरी परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!