लाडक्या बहिणींच्या हप्त्याची तारीख बदलली, ३००० रुपये कधी येणार?, मोठी अपडेट आली समोर…

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
या योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची रक्कम ७ मार्चपर्यंत लाडक्या बहिणींना दिली जाईल असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं. मात्र, आता लाडक्या बहिणींचं वेटिंग थोडं वाढणार आहे. आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींना आता पैसे उद्याच मिळणार आहेत.
मंत्री आदिती तटकरे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही उद्या लाडक्या बहिणींना हप्ता देणार आहोत. आदिती तटकरे पुढं म्हणाल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर आचारसंहिता असली तरी लाडक्या बहिणींना पैसे दिले गेले आहेत.
कुठलाही हप्ता गेला नाही जिथे आम्ही पैसे दिले नाहीत. प्रत्येक हप्त्याला प्रत्येक महिन्याला आम्ही पैसे दिले आहेत. त्यामुळे ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून प्रत्येक लाडक्या बहिणींना आपला हप्ता मिळेल, असे आदिती तटकरे म्हणाल्या आहे.