पाच मिनिटांपूर्वी दिसलेलं घर अचानक गायब, मातीचा ढिगारा आला अन् घडलं भयंकर, विसापूरमध्ये निसर्गाचा प्रकोप…


पुणे : सध्या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नदीला पूर आले आहेत. पुणे आणि मुंबईच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पुरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक मार्ग देखील बंद करण्यात आले आहे.

अनेक ठिकाणी दरड कोसळली असून रेल्वे आणि रस्ते वाहतूक देखील ठप्प झाली आहे. यामुळे यंत्रणा कामाला लागली आहे. असे असताना पुण्यातील मावळ तालुक्यातील पाठण गावात दुर्दैवी घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे विसापूर किल्ल्याचा एक भाग कोसळून या गावातील एक कुटुंब गाडलं गेलं.

यामुळे मोठी खळबळ उडाली असून पाच मिनिटांमध्ये होत्याच नव्हतं झाल आहे. नंदू तिकोणेंच्या कुटुंबावर काळरात्र चालून आली आहे. नंदू तिकोने, पत्नी आणि मुलगा घरात असताना काळाने घाला घातला. माळीण सारखी ही दुर्घटना घडली असून नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घरातील या तिघांचा शोध सुरु एनडीआरएफ पथकाकडून सुरु आहे. एकाचा मृतदेह सापडला आहे. तसेच अनेक ठिकाणी दरड कोसळली असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुणे-महाड महामार्गावर दरड कोसळली असून त्यामुळे वरंधा घाटातून होणारी वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे.

दरम्यान, वरंधा घाटात 4 ते 5 ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे वरंधा घाटातील वारवंड ते उंबर्डेवाडी दरम्यान 4 ते 5 ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे या पुणे भोर महाड मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!