सरकारने फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली ; पॅकेजवरून विजय वडेट्टीवारांची जोरदार टीका

मुंबई : मराठवाड्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. यावरून आता विरोधी पक्ष नेत्यांच्याकडून जोरदार टीका केली जात आहे.सरकारनं जाहीर केलेली मदत ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारी आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची गरज होती, असे म्हणत सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर विजय वडेट्टीवारांनी टीका केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, सरकारने जाहीर केलेलं पॅकेज शेतकऱ्यांना उभं करणार नाही तर कर्जाच्या खाईत लोटणार आहे. जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी म्हंटल आता त्याला वर्ष झालं आहे. आम्हाला सरकारवर विश्वास नाही. 31 हजार 600 कोटींची हिशोब आला कुठून, हा आकड्यांचा खेळ असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसेच गेल्या 15 दिवसात 74 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. घरदार उद्धवस्त झाले, शेती वाहून गेली आहे. मोठी मदत मिळेल अस शेतकऱ्यांना वाटत होतं. आज घोषित केलेली मदत तोंडाला पाने पुसणारी गेल्या वेळी 3 हेक्टर पर्यंत मदत केली यावेळी 2 हेक्टर मदत करण्यात आली आहे,असा टोला देखील त्यांनी लगावला.

केंद्र सरकारने राज्याला फक्त 10 हजार हेक्टर मदत केली अस म्हणायचं का? फळबाग, भाजी पाला उत्पादक, शेत पीक मोठे नुकसान झाले. पीक विमा नवीन धोरण नुसार अतिवृष्टी निकषांचा समावेश नाही. सरकार बनवाबनवी कशाला करत आहे, त्यांना त्याची मदत मिळणार नाही, असंही वडेट्टीवार यांनी म्हटल आहे.

