महाराष्ट्रातल्या ‘या’ शहरात पहिली पर्यावरणपूरक ई-वॉटर टॅक्सी, १ ऑगस्टपासून होणार शुभारंभ, वेळेची अन् पैशांची होणार बचत…


मुंबई : देशातील पहिली पर्यावरणपूरक आणि पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानाने सुसज्ज ई-वॉटर टॅक्सी सेवा अधिकृतपणे १ ऑगस्टपासून कार्यान्वित होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरुवातीला ही टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी आणि डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस ते जेएनपीए या दोन जलमार्गावर धावणार आहे.

ती पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या जुन्या टॅक्सींपेक्षा वेगळी असून पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. यामुळे समुद्रमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या टॅक्सीचे उत्पादन माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) यांनी केले आहे.

यामध्ये एमडीएलने सहा ई-वॉटर टॅक्सी तयार केल्या आहेत. पहिली वातानुकूलित २४ आसनी टॅक्सी ‘इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस’ या कंपनीकडे सुपूर्त करण्यात आली आहे. भविष्यात बेलापूर, घारापुरी, मांडवा यांसारख्या ठिकाणांपर्यंत विस्तारण्याची योजना आखण्यात आली आहे.

ई-वॉटर टॅक्सीमुळे इंधन खर्च वाचणार आहे. यामुळे प्रवाशांना परवडणाऱ्या दरात जलवाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात याबाबतचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच ही सेवा वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठीही प्रभावी ठरणार आहे. यामुळे याचे अनेक फायदे आहेत.

यासाठी चार्जिंग सुविधा डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस आणि जेएनपीटी जेट्टी येथे उभारण्यात येत आहे. जेएनपीटीमध्ये स्वतंत्र चार्जिंग पॉइंट उभारण्याचे काम येत्या काही दिवसात पूर्ण होईल. यामुळे देशांतर्गत पातळीवर ई-वॉटर टॅक्सीच्या संपूर्ण श्रृंखलेची उभारणी शक्य होणार आहे. यामुळे वेळेची बचत होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!