शेतकऱ्याचा नादच खुळा! मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरने मिरवणूक, जिल्ह्यात रंगली चर्चा..


धाराशिव : आपल्या राज्यातील शेतकरी हा तसा अल्पभूधारक सर्वसामान्य शेतकरी म्हणून ओळखला जातो. असे असले तरी त्याच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला तर तो कोणालाच ऐकत नाही. आता धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा चांगलाच बोलबाला होताना दिसतोय. काबाड कष्ट करणाऱ्या बळीराजाच्या या स्वॅगची चांगलीच चर्चा होत आहे.

धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची हौस म्हणून त्याने आपल्या मुलाच्या लग्नाची मिरवणूक थेट हेलिकॉप्टरने काढली आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरु आहे. धाराशिवच्या भूम तालुक्यातील अंतरवली गावातील शेतकरी भास्कर शिकेतोड या शेतकऱ्याने आपल्या मुलाच्या लग्नासाठी थेड हेलीकाॅप्टर मागवला आहे.

यामुळे ते बघण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली होती. शिकेतोड यांचा मुलगा आकाश आणि अस्मीता या दोघांचा विवाह आज पार पडला. यांच्याच लग्नात नवरदेवाची मिरवणूक थेट हेलीकॉप्टरने काढण्यात आल्याने पंचक्रोशीत या फिल्मी स्टाईल लग्नाची चर्चा झाली आहे. यामुळे शेतकऱ्याने आपल्या मुलाची हौसच पूर्ण केली आहे.

भास्कर शिकेतोड यांनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नात ही हेलीकॉप्टरमधून मिरवणूक काढाली होती, असे त्यांनी स्वतः सांगितले. भास्कर शिकेतोड यांच्या स्वतःच्या लग्नात त्यांची मिरवणूक मोटारसायकलवरुन काढण्यात आली होती. आपली हौस भागवण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांच्या लग्नात हेलीकॉप्टरने मिरवणूक काढली. यामुळे याची जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!