‘आजच्या ठळक बातम्या’ पुण्यातून संभाजीनगरला हलवण्याचा निर्णय रद्द, आता पुण्यातूनच बातम्या होणार प्रसारित
पुणे : देशातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रादेशिक बातम्याचा विभाग छत्रपती संभाजीनगरला हलवणार असा निर्णय झाला होता. मात्र अखेरीस हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे हे आकाशवाणीच्या पुणे केंद्रातूनच आजच्या ठळक बातम्या प्रसारित होणार आहे.
योगायोग की राजकीय चर्चा! शरद पवार, गुलाबराव पाटील यांचा एकाच रेल्वे डब्यातून प्रवास, चर्चांना उधाण..
आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय प्रसारभारतीने घेतला होता. त्यामुळे सविस्तर बातम्या ऐकणाऱ्या नागरिकांना बातम्या आता ऐकता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पुणे आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट औरंगाबादला हलवण्याचा निर्णयाला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्थगिती दिली आहे.
पावसाचे अंदाज चुकले! राज्यात मोसमी वाऱ्यांचा प्रवास रखडला, आता नवीन तारीख.
खासदार प्रकाश जावडेकर यांनी ठाकूर यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात चर्चा केली. तसेच प्रसार भारतीचे अपूर्व चंद्र आणि मुख्य कार्यकारी अधिकारी द्विवेदी यांच्याशीही जावडेकर यांची चर्चा झाली आहे.
खासदार प्रकाश जावडेकर सध्या तेलंगणा दौऱ्यावर असून त्यांनी या विषयासंदर्भात अनुराग ठाकूर यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. या बाबत स्वतंत्र सविस्तर चर्चा जावडेकर दिल्लीत गेल्यानंतर करणार असल्याचे जावडेकरांनी सांगितले आहे.
काय सांगता! पुण्यात चक्क पीएमपीएमएल बस गेली चोरीला, काय आहे प्रकरण?
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील या निर्णयाला स्थगिती द्यावी, या मागणीसाठी पत्र लिहून अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिलं होते. या दोघांच्या पाठपुराव्यामुळे आणि मागणीमुळे अनुराग ठाकूर यांनी निर्णयाला स्थगिती दिली आहे.
किती वाजता प्रसारित होते बातमी पत्र?
आकाशवाणी पुणे केंद्रावरुन सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पहिलं बातमीपत्र सादर केले जाते. त्यानंतर मग आठ वाजता, दहा वाजून ५८ मिनिटे आणि अकरा वाजून ५८ मिनिटे, त्याचबरोबर संध्याकाळी सहा वाजता अशी बातमीपत्रं सादर केली जातात.
आता पुण्याची ही सगळी बातमीपत्रं छत्रपती संभाजीनगरवरुन प्रसारित करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला होता. मात्र या निर्णयाला स्थागिती देण्यात आली आहे.