अखेर ठरलं! पुणे विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख आली समोर, मुरलीधर मोहोळ यांनी दिली महत्वाची माहिती…

पुणे : पुरंदर विमानतळाच्या उद्घाटनाची अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. विमानतळाचा डीपीआर सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करुन, मार्च २०२९ पर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही घोषणा केली आहे.
तसेच महाराष्ट्रातील विमानसेवा आणि विमानतळांच्या विकासाबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील ‘सह्याद्री’ येथे पार पडली. राज्यातील विमानतळांच्या विकासकामांना गती देणे आणि विमानसेवा वाढविण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
मोहोळ म्हणाले की, पुरंदर विमानतळ जागा अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार असून, विमानतळाचा डीपीआर सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करुन, मार्च २०२९ पर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, भारतीय विमानतळ प्राधिकरण, लष्कर, महाराष्ट्र विमानतळ महामंडळ आणि इतर विविध सरकारी संस्थांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व भागधारकांनी चर्चेत भाग घेतला आहे.