मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, अधिकृत संकेत स्थळावर पाहता येणार निकाल..

पुणे : बारावीचा निकाल लागल्यानंतर बहुप्रतीक्षित अशा दहावीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निकालाची पालक आणि विद्यार्थी आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. अशातच आता एक मोठी माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल उद्या म्हणजेच १३ मे रोजी जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. १३ मे रोजी सकाळी ११ वाजता बोर्डाचे अध्यक्ष निकाल जाहीर करतील. नंतर १ वाजता अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे.
उद्या दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. तेव्हापासूनच दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती.
दरम्यान, ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. उद्या दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल.
कुठे पाहाल निकाल?
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org