मोठी बातमी! भीमा कोरेगाव प्रकरणी विश्वास नांगरे पाटलांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची होणार चौकशी…!
पुणे : 1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ शौर्य दिन साजरा करण्यासाठी लोक जमले होते. यावेळी लोकांवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे घडलेल्या हिंसाचारा एका तरुणाचा मृत्यू झाला होता. यामुळे मोठा हिंसाचार झाला होता.
वाहनांची जाळपोळ, मालमत्तेचे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर जमावाला भडकावल्याचा आरोप करण्यात आला होता.
असे असताना आता या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, सुवेझ हक आणि डॉ. शिवाजी पवार यांची चौकशी होणार आहे. 21 ते 25 जानेवारी दरम्यान सह्याद्री अतिथीगृह इथे या सगळ्यांची चौकशी होणार आहे.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हर्षाली पोतदारची 21 ते 22 जानेवारी, डॉ शिवाजी पवार यांची 21 ते 23 जानेवारी, विश्वास नांगरे पाटील 24 ते 25 जानेवारी आणि सुवेझ हक यांची 24 ते 25 जानेवारी दरम्यान चौकसी होणार आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. 21 ते 25 जानेवारी दरम्यान तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांची साक्ष नोंदवली जाणार आहे.