राजधानी दिल्ली पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली! घरातील सामानाला हादरे, भीतीने लोक रस्त्यावर…


दिल्ली : दिल्लीत आज (ता.१७) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. कित्येक सेकंद घरे, इमारती थरथरल्याचे जाणवत होते. भूंकपाच्या भीतीने लोक घाबरून घराबाहेर पडले आहे.

भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केलवर ४.३ इतकी मोजली गेली, त्याचे केंद्र दिल्लीच्या आसपास जमिनीपासून ५ किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे दिल्लीला जोरदार धक्के जाणवले. काही सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की इमारतींच्या आत जोरदार कंपने जाणवू लागली.

पहाटे ५.३६ वाजता हा भूकंप झाल्याची माहिती आहे, त्यामुळे लोकांची झोप उडाली. भूकंपाचे हादरे बसताच लोकांमध्ये घबराट पसरली आणि खबरदारी म्हणून ते तात्काळ घराबाहेर पडले. दिल्ली-एनसीआर तसेच शेजारील राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे.

सुदैवाची बाब म्हणजे सध्या कुठूनही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. दिल्ली-एनसीआर भूकंपाच्या झोन IV मध्ये येते, ज्यामुळे येथे मध्यम ते तीव्र भूकंपाचा धोका असतो. दिल्ली एनसीआरमध्ये वेळोवेळी भूकंपाचे धक्के जाणवत असतात. मात्र या तीव्रतेचे धक्के बऱ्याच दिवसांनी जाणवले आहेत. अनेक दशकांनंतर भूकंपाचा केंद्रबिंदूही दिल्लीजवळ आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, हे भूकंपाचे धक्के पहाटे ०५:३६ वाजता जाणवले. त्याचे केंद्र दिल्लीच होते, ज्याची खोली ५ किमी होती. हा भूकंप दिल्ली-एनसीआरमध्ये २८.५९ उत्तर अक्षांश, ७७.१६ पूर्व रेखांश, ५ किमी खोलीवर झाला. अनेक वर्षानंतर भूकंपाचे केंद्र दिल्लीच्या जवळ होते. दिल्ली हे भूकंपाचे केंद्र असल्याने येथील लोकांना बराच वेळ भूकंपाचे धक्के जाणवले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!