वातावरण तापलं! गल्ली टू दिल्ली, आता कमळाकडे…’ सुनील तटकरे भाजपच्या वाटेवर? शिंदेसेनेच्या आमदाराच्या दाव्याने खळबळ


पुणे : स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वीच महायुतीत जोरदार ठिणगी पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना अडकवण्यात अजित पवारांच्या निकटवर्तीयाचा हात असल्याचा आरोप करत आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.इकडची बॅग भरली गल्ली टू दिल्ली,आता कमळाकडे….वाट पकडली आहे. त्यामुळे तटकरे हे भाजपात जातील असे भाकीत महेंद्र दळवी यांनी केले आहे.

हा पुढे बोलताना ते म्हणाले, खरं तर नाव बदनाम करणारी ही व्यक्ती आहे. महाराष्ट्रात कधी कोणी विचारलं तर रोह्याचं नाव सांगू नका अस मला वाटतं, प्रत्येक घोटाळे बास म्हटलं तटकरेचा चेहरा समोर येतो सिंचन घोटाळ्याच्या अगोदर देखील अनेक घोटाळे आहेत कदाचित तुम्हाला माहीत नसतील अशी टीका दळवी यांनी केली आहे. रोहा येथे झालेल्या सभेत दळवी यांनी राष्ट्रवादी आणि तटकरेंवर चांगली तोफ डागली आहे.ऱाष्ट्रवादीच खाली होत चालली आहे. लोक कंटाळले आहेत. सिंचन घोटाळ्यापासून आतापर्यंत घोटाळेच घोटाळे लाजही वाटत नाही अशी परिस्थिती आहे.आम्ही मनाचे शेठ आहोत.परवा तुमच्या सभेत मी केलेले आरोप हे खरे आहेत, ते त्रिवार सत्य आहे, असा चिमटा महेंद्र दळवी यांनी अजितदादा पवार आणि सुनील तटकरे यांना काढला आहे. यावर आता राष्ट्रवादी काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय म्हटला तर चीटिंगच असं म्हणता येईल. ज्या नेत्याच्या आश्रय खाली काम करायचे त्यालाच फसवायचा ही संस्कृती आहे. रोह्याचं नाव बदनाम होणे म्हणून या लोकांना हद्दपार करणे काळाची गरज आहे, असे महेंद्र दळवी म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!