ठाकरे एकत्र आले ते ठिक, पण यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण? भाजप नेत्याची जहरी टीका…


मुंबई : मुंबईत आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर भाजपला आव्हान दिलं. त्यावर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं.

दोन ठाकरे बंधू एकत्र आले ते चांगलंच झालं, पण यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना-मनसेवाल्यांनी सांगावं असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. यांच्या स्टेजवर समाजवादी नेते, कॉम्रेड लोक दिसले, आता यांनी फक्त सीमीच्या दहशतवाद्यांशी युती करायची राहिली आहे अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.

नितेश राणे म्हणाले की, दोन कुटुंब एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे. हा त्यांच्या कुटुंबाचा विषय आहे. यांचा विषय तर थेट अंतरपाटापर्यंत गेला. आता यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना-मनसेवाल्यांनी सांगावं, असे ते म्हणाले आहे.

नऊ महिन्याआधीच महायुतीला लोकांनी निवडून दिलं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत आम्हीच निवडून येऊ असा विश्वासही नितेश राणे व्यक्त केला. मुंबईतील हिंदू समाज आता यांना परत घरात बसवणार असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी कोणत्या शाळेत शिकले असा प्रश्न केला. त्यावर नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं. मोदी शाळेत ज्या शाळेत शिकले त्या शाळेत शिकण्याची यांची लायकी नाही असा टोला त्यांनी लगावला.

एकट्या देवेंद्र फडणवीसांनी काय काय केलं हे महाराष्ट्राने पाहिलं. दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर हिंदू विरोधी देशद्रोह्यांना सर्वात मोठा आनंद झाला असेल असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!