उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, अलकनंदा नदीत कोसळली प्रवासी बस, महाराष्ट्रातील प्रवाशांवर काळाचा घाला…

उत्तराखंड : चारधाम यात्रा करण्यासाठी महाराष्ट्रातून निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. चारधामला दर्शनासाठी पोहोचण्याआधीच नियतीनं घात केला आहे. उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये एक बस अलकनंदा नदीत कोसळून अपघात झाला आहे. या हृदयद्रावक घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून १० जण अद्याप बेपत्ता आहेत.
केदारनाथहून बद्रीनाथला जाणाऱ्या टेम्पोने खासगी बसला धडक दिली. या धडकेमुळे नियंत्रण सुटल्याने बस अलकनंदा नदीत कोसळली. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एकूण सात जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन महिला, दोन मुले आणि तीन पुरुषांचा समावेश आहे, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर १० जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे, ज्यांच्या शोधासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे.
बसमध्ये एकूण २० प्रवासी होते. बसमध्ये चालकासह एकूण २० जण होते. ७ प्रवासी गुजरातचे, २ महाराष्ट्राचे आणि ७ राजस्थानचे होते. चालक हरिद्वारचा रहिवासी होता. याशिवाय दोन जण मध्य प्रदेशचे होते.
जखमींची संपूर्ण यादी पुढील प्रमाणे..
१- दीपिका सोनी, राजस्थान, वय ४२ वर्षे.
२- हेमलता सोनी, राजस्थान, वय ४५ वर्षे.
३- ईश्वर सोनी, गुजरात, वय ४६ वर्षे.
४- अमिता सोनी, मीरा रोड, महाराष्ट्र, वय ४९वर्षे.
५- सोनी भावना ईश्वर, गुजरात, वय ४३ वर्षे.
६- भव्य सोनी, गुजरात, वय ०७ वर्षे.
७- पार्थ सोनी, मध्य प्रदेश, वय १०वर्षे.
८- सुमित कुमार, हरिद्वार, वय २३ वर्षे.