सुसाट कारचा टायर फुटला अन् क्षणात झालं होत्याच नव्हतं, साताऱ्यात भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू…

सातारा : सातारा- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर मोठी दुर्घटना घडली. सातारा शहरातील बॉंम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ चालू गाडीचा टायर फुटल्याने तवेरा गाडीने पीकप टेम्पोला जोरदार धडक दिली. ज्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जणांच मृत्यू झाला असून १ जण गंभीर जखमी झाला आहे.
जखमीवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झालेली तवेरा गाडी नवी मुंबईहून जयसिंगपूरकडे निघाली होती. बॉंम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ चालू गाडीचा टायर फुटल्याने समोर असणाऱ्या पिकप टेम्पोला जोरदार धडक दिली. ज्यामुळे हा भीषण अपघात झाला.
मृतांमध्ये २ पुरुषांसह एका महिलेचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की, तवेरा गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. साखर झोपेत असतानाच तिघांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..