स्वारगेटची वाहतूक कोंडी अखेर सुटणार!! दोन नवीन मेट्रो स्टेशन होणार, जाणून घ्या…


पुणे : पुणे शहरात वाहतुकीची मोठी समस्या समोर येत आहे. यामुळे प्रवास करताना मोठ्या अडचणी निर्माण होतात. अगदी कमी अंतर असले तरी एक दोन तास प्रवास करावा लागतो. यामुळे सगळे पुणेकर वैतागले आहेत. असे असताना एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांनी याबाबत एक महत्वाची घोषणा केली आहे. स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गावर वाहतूक समस्या सोडवण्यासाठी दोन नवीन स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. या मार्गावरील ‘बालाजीनगर’ हे स्थानक महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मान्यता मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरातील खडकवासला- खराडी मेट्रो मार्ग आणि एस.एन.डी.टी ते माणिकबाग मेट्रो जोडमार्ग हे दोन्ही प्रकल्प सध्या केंद्र सरकारडे प्रस्तावित आहेत. यावर लवकरच निर्णय होणार आहे. तर वनाज ते चांदणी चौक मेट्रो मार्ग तसेच रामवाडी ते विठ्ठलवाडी हे दोन मार्ग अंतिम मंजुरीसाठी राज्य कॅबिनेटकडे प्रस्तावित केले आहेत.

याबाबत वर्क ऑर्डर निघाल्यानंतर लगेच कात्रज ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम सुरू करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे असे झाले तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी कमी होईल, असेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, धनकवडी आणि बालाजीनगर मेट्रो स्थानक होण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. वाहतुकीस मदत व्हावी, यासाठी परिवहन विभागांतर्गत पुणे शहरातील रिक्षा स्टँड, बस स्टँड किती आहेत, याचा आढावा घेऊन रोडमॅप करण्याचे काम सुरू आहे. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत बदल दिसणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!