पार्थ पवार प्रकरणात सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, केलं सर्वात मोठं वक्तव्य; म्हणाल्या, काहीतरी काळंबेरं…


पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्यातील हायप्रोफाईल कोरेगाव आयटी पार्क परिसरातील 1800 कोटी किंमतीची सरकारी जमीन अवघ्या 300 कोटीत खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी संबंधित तहसीलदार आणि तलाटींवर कारवाई केली आहे. पण या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित पवार यांनी या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

विरोधक मात्र अजित पवार यांनी राजीनामा द्यावा तसेच या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. असे असतानाचा आता अजित पवार यांची बहीण खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी गंभीर स्वरुपाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी काहीतरी काळंबेरं आहे, अशी शंका व्यक्त केली आहे.

       

पार्थ पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे. तहसीलदार आणि तलाठी यांची नोकरी गेली. पण ते म्हणत आहेत की आम्ही सहीच केली नाही. सही केलेली नसतानाही त्यांना कामावर काढून टाकण्यात आले.

तो गरीब आहे, त्याला आवाज नाही म्हणून कामावर काढून टाकण्यात आले. हा अन्याय नाही का? असा रोखठोक सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच तहसीलदार आणि तलाठ्याचे निलंबन अगोदर मागे घ्या, अशी मोठी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.

पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी तहसीलदारांचं निलंबन करण्यात आलं का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, पार्थ पवार यांना पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहारप्रकरणी काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यावर ते म्हणाले की माझी कायदेशीर टीम यावर उत्तर देईल. आता प्रश्न हा महाराष्ट्र सरकारचा आहे. महाराष्ट्र सरकार आपल्याला गोंधळात टाकत आहे.

महाराष्ट्र सरकार म्हणत आहे की त्या जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही. मग व्यवहार होऊ शकत नसेल तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी आली? तहसीलदराला कामावरून का काढण्यात आले? तहसीलदार सांगतोय की मी सहीच केली नाही. असे असेल तर दाल मे कुछ काला है. काहीतरी गोलमाल आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.

माझं पार्थ पवार यांच्याशी माझं बोलणं झालं. मी पार्थसोबत सकाळीच बोलले. मी पहिला फोन अगोदर पार्थला केला. तो म्हणतोय की यात माझी काहीही चूक नाही. माझे माझ्या वकिलांशी बोलणे झाले आहे, असे त्याने मला सांगितले. तसेच भविष्यात वकील सगळे कागदपत्रे घेऊन तुमच्यासमोर येतील, अशी माहितीही सुप्रिया सुळे यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!