Supriya Sule : अजितदादा बहिणीला काय दिवाळी गिफ्ट देणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या..

Supriya Sule : राष्ट्रवादीतील फुटीनंतर होणाऱ्या या वर्षीच्या पवारांच्या दिवाळीमध्ये अजित पवार सहभागी होणार का नाही याची उत्सुकताही सर्वांनाच लागली आहे. त्यातच शनिवारच्या एका कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे एकत्रित दिसले. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अजितदादा आपल्या बहिणीला दिवाळीचं काय गिफ्ट देणार यावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्यात राजकीय मतभेद आहेत, पण ते मतभेद आम्ही कुटुंबामध्ये आणत नाही, आमची लढाई ही वैचारिक आहे, व्यक्तिगत नाही अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. तर यंदाच्या दिवाळीत दादा आपल्या बहिणीला काय गिफ्ट देणार हे मला काय माहिती? दादालाच विचारा काय गिफ्ट देणार असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. Supriya Sule
तसेच आता दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सर्व पवार कुटुंबीय एकत्र येणार आहे. त्यामध्ये अजित पवार सहभागी होणार का असा प्रश्न विचारल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमचे वैचारिक मतभेद आहेत, मनभेद नाहीत. जेव्हा आपले वय वाढते तेव्हा वैचारिक प्रगल्भता वाढली पाहिजे.
आमची लढाई वैचारिक आहे व्यक्तिगत नाही. राजकीय मतभेद आहेत पण भाजपच्या अनेक नेत्यांशी आमचे संबंध आहेत. दादा कार्यक्रमात मास्क लाऊन बसले होते, त्यामुळे त्यांना भेटण्याची मुभा आहे का नाही हे डॉक्टर ठरवतील. तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद हे शरद पवारांचे टॉनिक आहे असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.