Supriya Sule : आईच्या प्रचारासाठी रेवती सुळे उन्हातान्हात उतरल्या प्रचाराच्या मैदानात, बारामतीत कोण मारणार बाजी?


Supriya Sule : बारामतीत आईच्या प्रचारासाठी आला रेवती सुळे मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. रेवती सुळेंकडून बारामतीत सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरू आहे. अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार आणि रेवती सुळे बारामतीत झालेल्या पदयात्रेत सहभागी झाली होते.

यंदाच्या निवडणुकीत पवार कुटुंबातील लेकी- सुनांच्या उमेदवारीची चर्चा असताना सुप्रिया यांना पवार कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळताना दिसत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे.

प्रचारासाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्याने महाविकास आघाडी तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत बारामती मतदारसंघावर महायुतीच्या माध्यमातून विजय मिळवायचाच असा संकल्प केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने केला आहे.

बारामतीची लढत पवार विरुद्ध पवार अशी असल्याने पवार कुटुंबातील सदस्यांनी देखील निवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार, जय पवार प्रचारात उतरले आहेत. तर आमदार रोहित पवार हे सुळे यांच्या बाजूने प्रचार करत आहेत. Supriya Sule

आता सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे या देखील आपल्या आईच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या असल्याचे पहायला मिळत आहे. त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार हे देखील प्रचारात उतरले आहेत.

बारामती शहरात या दोघांनी पदयात्रा काढत सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला.यापूर्वी दोनवेळा बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांना पराभवाचा धक्का देण्याचे स्वप्न भाजपने पाहिले होते. मात्र त्यामध्ये यश आले नाही.

त्यामुळे यंदाच्या वर्षी राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारला जाहीरपणे पाठिंबा देत सत्तेत आणि पर्यायाने महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या माध्यमातून बारामतीचा गड या मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी भाजपने महायुतीचे उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह केंद्रातील नेत्यांनी ताकद लावली आहे. सुळे यांचा पराभव झाल्यास ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा तो पराभव असणार आहे. त्यामुळे या जागेसाठी साम-दाम-दंड भेद याचा वापर करून विजय मिळविण्याचा प्रयत्न महायुतीचा राहणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!