Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे ठरल्या दुसऱ्यांदा ‘संसद महारत्न पुरस्कार’च्या मानकरी..

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलग दुसऱ्यांदा संसद महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. चेन्नईतील प्राइम पॉइंट फाउंडेशन आणि द मॅगझीनकडून दर पाच वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी सुळेंना १६ व्या लोकसभेतील कामगिरीसाठी सन्मानित केले होते.
संसद महारत्न पुरस्कार १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीत प्रदान केला जाणार आहे. सुप्रिया सुळे यांनी पाच डिसेंबरपर्यंत संसदेत ९४ टक्के उपस्थिती लावली आहे. त्यात त्यांनी २३१ चर्चासत्रांमध्ये भाग घेतला आहे.
सभागृहात ५८७ प्रश्न विचारले आहेत आणि एकूण १६ विधेयके मांडली आहे. त्यांना आतापर्यंत सात वेळा संसदरत्न पुरस्कार प्रदान केला आहे. तसेच सर्वोत्तम कामगिरीसाठी विविध पुरस्कार मिळाले आहेत. Supriya Sule
लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची संकल्पना माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची आहे, अशी माहिती फाउंडेशनचे के श्रीनिवासन यांनी दिली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने विश्वासाने मला लोकसभेत पाठवलं आणि त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सदैव कार्यरत राहील, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी पुरस्कार जाहीर झाल्यांनतर दिली आहे.
दरम्यान, संसद महारत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, माझी निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली याचा आनंद आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने विश्वासाने मला लोकसभेत पाठवलं आणि त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सदैव कार्यरत राहिन असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.