Supriya Sule : अजितदादा मलाच मत देतील, भर सभेत सुप्रिया सुळे यांचा मोठा गौप्यस्फोट…


Supriya Sule : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या रंजक घडामोडी सुरु आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांनी अर्ज दाखल केला असून यावेळी त्यांनी अजबच दावा केला आहे. ज्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. ते म्हणाल्या सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली असली तरी अजित पवार मला मतदान करतील.

कदाचित माझा मराठीतील कार्यअहवाल अजित पवारांनी वाचला नसावा. आजच माझा अहवाल त्यांना पाठवून देते. यासाठी थोडासा जरी वेळ काढला तर ते मेरीटवर मलाच मतदान करतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. Supriya Sule

विद्यमान खासदारांनी बारामतीमध्ये विकासनिधी आणला नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी हा दावा केला आहे.

तसेच देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीसांचे मन:पूर्वक आभार मानते. ते एक गोष्ट कबूल करतात. काश्मीर ते कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे, त्यांना शरद पवार किंवा आमच्या कुणाही विरोधात षडयंत्र करण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नव्हता. ते खरे बोलले, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!