अजितदादांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी सुनेत्रा पवार भावुक, सुप्रिया सुळेंच्याही डोळ्यांत अश्रू; वातावरण गहिवरलं..


पुणे : दिवंगत नेते अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेत अनावरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर हा सोहळा पार पडला. यावेळी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक झाल्या. भाषणादरम्यान त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?

पुणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “आजचा क्षण माझ्यासाठी अतिशय भावनिक आहे. ज्या पुणे जिल्हा परिषदेवर आदरणीय दादांनी मनापासून आणि जीवापाड प्रेम केले, ज्या पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, त्याच जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज त्यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे. ही माझ्यासाठी आणि सर्वांसाठीच खूप मोठी आणि भावुक करणारी गोष्ट आहे.”

यावेळी अजित पवार यांच्या आठवणी सांगताना सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला. “दादा, तुमचा प्रवास अर्धवट राहिला असेल; पण तुमच्या स्वप्नांचा प्रवास आम्ही पूर्ण करू,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अमित शाह यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या हस्ते अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते, मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवार अनुपस्थित; सुप्रिया सुळे यांची उपस्थिती

या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांचे नाव प्रमुख पाहुणे म्हणून होते. मात्र, ते या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या जागी खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावत अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!