रविवारी अजितदादांसोबत काल पवार साहेबांसोबत आणि आता थेट खासदारकीचा राजीनामा, अमोल कोल्हे यांचा मोठा निर्णय…


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षात आता तिसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली.

राष्ट्रवादीचे आमदार फोडून अजित पवारांनी एनडीएमध्ये गेले. त्यांच्यासोबत अनेक आमदार खासदार असल्याचे सांगितले जात असताना आता पुणे जिल्ह्यातील एक खासदार माघारी फिरला आहे.

शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा शरद पवारांसोबत असल्याचे म्हटले आहे. असे असताना आता त्यांनी थेट राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ते म्हणाले, आपण हा राजीनामा शरद पवारांकडे देणार आहे. मतदारांनी जे मतदान केले, ते एका विचारधारेला समोर ठेवून दिले होते, त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून आपण राजीनामा देणार आहे. आपण छत्रपती शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज यांच्या भूमिका करून इतिहास सांगण्याचा प्रयत्न करीत असताना आपणच जर नैतिक मुल्यांच्या विरोधात जात असू तर ते योग्य नाही.

मी पवारसाहेबांसोबतच आहे, मात्र जे अनैतिक राजकारण सुरू आहे, ते पाहता मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देणार आहे असे कोल्हे यांनी सांगितले आहे. यामुळे आता राजीनामा मंजूर होणार का हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!