Sukhdev Singh Gogamedi : मोठी बातमी! सुखदेव सिंह गोगामेडींच्या मारेकऱ्यांना अखेर अटक, धक्कादायक माहिती आली समोर..


Sukhdev Singh Gogamedi : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनाचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकणी आता मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली आणि राजस्थानच्या पोलिसांनी चंदीगडमधील एका हॉटेलमधून या घटनेत सहभागी असलेल्या दोन शूटर्ससह तिघांना अटक केली आहे. Sukhdev Singh Gogamedi

रोहित राठोड, नितीन फौजी आणि उधम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, पोलिस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा उधम देखील गुन्ह्यात सहभागी असलेल्या रोहित आणि नितीन या दोन आरोपींसोबत उपस्थित होते. गुन्हा केल्यानंतर रोहित राठोड आणि नितीन फौजी पोलिसांना चकमा देण्यासाठी सतत त्यांची जागा बदलत होते.

जयपूरमध्ये सुखदेव सिंगची हत्या केल्यानंतर दोघेही हरियाणातील हिस्सारला पोहोचले. यानंतर पुन्हा बसने मनालीला पळून गेला. पण, दोघेही इथेच थांबले नाहीत, ते इथूनच चंदीगडला पोहोचले. मात्र, दोन्ही नराधमांनी चूक केली. या चोरट्यांनी त्यांचे मोबाईल चालू ठेवले होते. त्यांच्या मोबाईल लोकेशनच्या मदतीने पोलिसांनी चंदीगड गाठले आणि दोघांनाही अटक केली आहे.

हल्लेखोरांनी एकूण १७ राउंड फायर केले. गुन्हा केल्यानंतर हल्लेखोरांनी बंदुकाही लपवून ठेवल्या. जाताना त्याच्याकडे फक्त रोख रक्कम आणि मोबाईल होता. कोणाला त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून त्याने हे केले.

हे दोन्ही गुन्हेगार वीरेंद्र चहान आणि दानाराम यांच्या सतत संपर्कात होते, असे सांगण्यात येत आहे. या दोघांच्या सांगण्यावरून त्याने सुखदेव सिंगचा खून केला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!