ऑक्टोबरमध्ये शाळांना सुट्ट्याच सुट्ट्या; ११ दिवसांचा ब्रेक मिळणार? पाहा संपूर्ण यादी..

मुंबई : ऑक्टोबर महिन्यात सण-उत्सवांची रेलचेल असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास आणि गृहपाठाच्या धावपळीतून काही दिवसांची विश्रांती मिळणार आहे. सणांसोबत शनिवार-रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्या आल्याने विद्यार्थ्यांसाठी हा महिना विशेष ठरणार आहे.
ऑक्टोबर २०२६ मध्ये गांधी जयंती, घटस्थापना आणि विजयादशमीसह विविध सण आहेत. याशिवाय शनिवार आणि रविवारच्या नियमित सुट्ट्याही आहेत. त्यामुळे ज्या शाळांमध्ये शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस सुट्टी असते, तिथे महिनाभरात एकूण ११ दिवसांपर्यंत सुट्ट्या मिळण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर २०२६ मधील संभाव्य सुट्ट्या
२ ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार) – महात्मा गांधी जयंती
३ ऑक्टोबर (शनिवार) – साप्ताहिक सुट्टी
४ ऑक्टोबर (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
१० ऑक्टोबर (शनिवार) – साप्ताहिक सुट्टी
११ ऑक्टोबर (रविवार) – घटस्थापना, साप्ताहिक सुट्टी
१७ ऑक्टोबर (शनिवार) – साप्ताहिक सुट्टी
१८ ऑक्टोबर (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
२० ऑक्टोबर (मंगळवार) – विजयादशमी, दसरा
२४ ऑक्टोबर (शनिवार) – साप्ताहिक सुट्टी
२५ ऑक्टोबर (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
३१ ऑक्टोबर (शनिवार) – साप्ताहिक सुट्टी


विद्यार्थ्यांना सुट्ट्यांचे नियोजन करता येणार
शनिवार-रविवारच्या नियमित सुट्ट्यांसोबत सणांच्या सुट्ट्या आल्याने विद्यार्थ्यांना कुटुंबासोबत वेळ घालवण्याची तसेच सणांचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. मात्र, प्रत्येक शाळेतील सुट्ट्यांचे वेळापत्रक वेगळे असू शकते. काही शाळांमध्ये शनिवारची सुट्टी असते, तर काही शाळांमध्ये केवळ रविवारची सुट्टी असते.
शालेय सुट्ट्यांचे वेळापत्रक संबंधित राज्य, शिक्षण विभाग आणि शाळेच्या बोर्डाच्या नियमांनुसार बदलू शकते. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेने जाहीर केलेले अधिकृत सुट्टीचे वेळापत्रक तपासणे आवश्यक आहे.
