अवघ्या ९,९९९ रुपयांत वैष्णोदेवीसह शिवखोडी, सुवर्ण मंदिराचं दर्शन! पुण्यातून विशेष रेल्वे यात्रा; जेवणापासून राहण्यापर्यंतची व्यवस्था, असा आहे ८ दिवसांचा संपूर्ण बेत


उरुळीकांचन : माँ वैष्णोदेवीच्या दर्शनाची इच्छा असणाऱ्या भाविकांसाठी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच धार्मिक सहलीची संधी उपलब्ध झाली आहे. भक्त श्रावणबाळ-देवदर्शन सेवा फाउंडेशनच्या वतीने पुण्यातून जम्मू-काश्मीर आणि अमृतसर परिसरातील प्रमुख धार्मिक स्थळांची यात्रा आयोजित करण्यात आली आहे. सात रात्री आणि आठ दिवसांच्या या सहलीत वैष्णोदेवी, शिवखोडी, सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग आणि वाघा बॉर्डरला भेट देण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे या यात्रेसाठी प्रति व्यक्ती केवळ ९ हजार ९९९ रुपये शुल्क ठेवण्यात आले असून, वातानुकूलित आणि विनावातानुकूलित रेल्वे प्रवासाचे पर्याय उपलब्ध आहेत. या यात्रेचे आयोजन वाघोलीचे सामाजिक कार्यकर्ते सुनिल चाचा जाधवराव व मंजुनाथ स्वामी यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर केलेले आहे.

या यात्रेचे पुण्यातून १६ जानेवारी २०२७ रोजी प्रस्थान होणार आहे. पहिल्या दिवशी पुण्यातून रेल्वेने प्रवास सुरू होईल. प्रवासादरम्यान नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण रेल्वेमध्ये दिले जाणार आहे. दुसऱ्या दिवशी मुंबई आणि दिल्लीमार्गे रेल्वे प्रवास सुरू राहील. तिसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ११ वाजता कटरा येथे आगमन होईल. हॉटेलमध्ये मुक्कामाची व्यवस्था केल्यानंतर जेवण करून भाविकांना माँ वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी रवाना केले जाणार आहे.

चौथ्या दिवशी भाविकांना विश्रांतीसाठी वेळ देण्यात येणार असून, रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या दिवशी नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण हॉटेलमध्ये मिळेल. पाचव्या दिवशी बसने शिवखोडी येथे नेण्यात येणार असून, दर्शनानंतर रात्री कटरा येथे परत येऊन रेल्वेने अमृतसरकडे प्रस्थान होईल. सहाव्या दिवशी अमृतसर येथे पोहोचल्यानंतर सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग आणि परिसरातील इतर धार्मिक व पर्यटनस्थळांना भेट देण्याचे नियोजन आहे. त्यानंतर रात्री पुण्याकडे परतीचा प्रवास सुरू होईल. सातव्या दिवशी रेल्वे प्रवास आणि आठव्या दिवशी पुण्यात आगमन होईल.

यात्रेच्या व्यवस्थेमध्ये शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण तसेच पिण्याच्या पाण्याचा समावेश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. हॉटेलमध्ये चार जणांसाठी एक खोली अशा पद्धतीने मुक्कामाची व्यवस्था असेल. प्रत्येक रेल्वे डब्यात अनुभवी टूर मॅनेजर आणि सुरक्षा रक्षक सोबत असणार आहेत. याशिवाय मार्गातील इतर धार्मिक आणि पर्यटनस्थळांनाही भेट देण्याचे नियोजन आहे.

ही यात्रा ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर आयोजित करण्यात आली आहे. बुकिंग सुरू झाले असून, अधिक माहितीसाठी श्री. सुनील चाचा जाधवराव (९८२३४०७६७६), श्री. मंजुनाथ स्वामी (९८८१२३४५६३) तसेच ८९५६४९६०६० आणि ८३०८६७४८२६ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. कार्यालयाचा पत्ता कृष्णा कॉम्प्लेक्स, तळमजला, अष्टेकर ज्वेलर्सजवळ, पुणे-नगर रस्ता, वाघोली, पुणे असा आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी आयोजकांनी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

‘दर्शनाचे पुण्य तुमचे, सेवेचे पुण्य आमचे’ हे ब्रीद घेऊन आयोजित केलेल्या या यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी जागा, रेल्वे प्रवासाचा प्रकार आणि शुल्कामध्ये समाविष्ट असलेल्या सुविधांची माहिती आयोजकांकडून घेऊन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!