Sudha Murty : सुधा मूर्तींची राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती, पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन…


Sudha Murty : ज्येष्ठ लेखिका, इन्फोसिस कंपनीच्या मालकीण सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट करत याची माहिती दिली.

सुधा मुर्ती यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत महिला दिनी मोदींनी त्यांना या नियुक्तीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांचे नामांकन राज्यसभेसाठी केल्याने मला आनंद होत आहे.

सुधा मूर्ती यांचे सामाजिक कार्य, शिक्षण यांसह विविध क्षेत्रात योगदान मोठे आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेत मूर्ती यांची उपस्थिती असणे ही आमच्या ‘नारी शक्ती’चा एक शक्तिशाली पुरावा आहे. त्यांचा संसदेतील सहभाग हा आपल्या देशाचे नशीब घडवण्यात असलेले महिलांच्या सामर्थ्याचे उदाहरण आहे. त्यांना संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा. Sudha Murty

कोण आहेत सुधा मूर्ती?

सुधा मुर्ती या इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी, इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. तसेच त्या एक यशस्वी उद्योजिका, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

तसेच भारतातील सर्वात मोठी ऑटो मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअरिंग कंपनी असलेल्या टेल्कोमध्ये काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला अभियंता आहेत. सुधा मूर्ती यांना मुलगी अक्षता मूर्ती आणि मुलगा रोहन मूर्ती अशी दोन मुले आहेत.

अक्षता नारायण मूर्ती या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी आहेत. तर रोहन मूर्ती हे मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया तसेच सोरोको या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन स्टार्टअपचे संस्थापक आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!