पुण्यात शाळांना अचानक सुट्टी! गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यामुळे पालकांची धांदल, पालकांकडून संताप..


पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात आहेत. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला. या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणासह अन्य कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

याचा थेट परिणाम शालेय वाहतुकीवर झाल्याने अनेक शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे, तर काही शाळांनी आपली वेळ बदलली आहे. विद्यार्थ्यांना अचानक सुट्टी मिळाल्यामुळे पालकांचे आधीचे नियोजन कोलमडले असून, अनेकांना नव्याने दिवसाची आखणी करावी लागत आहे. केवळ पालकच नव्हे तर खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनाही या वाहतूक बदलामुळे अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे.

यामुळे पालकांनी एकच संताप व्यक्त केला आहे. याबाबत पूर्वकल्पना दिली नसल्याचे पालकांनी सांगितले. या निर्णयानुसार आज दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत संबंधित परिसरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीत बदल लागू करण्यात आले आहेत. सकाळी सकाळी यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे. गृहमंत्री शहा आज पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, कोंढवा बुद्रुक, खडी मशिन चौक आणि वडाची वाडी या भागांना भेट देणार आहेत.

दरम्यान, अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे पुण्यात ४ जुलै रोजी दुपारी १२ ते संध्या ५ या वेळेत खास वाहतूक बदल करण्यात आले आहेत: मंतरवाडी फाटा – खडीमशीन चौक ते कात्रज चौक मार्गावर सर्व जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. बंडगार्डन वाहतूक विभागातील मोर ओढा सर्किट हाऊस चौक ते आयबी चौक या मार्गावर वाहतूक एकेरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेषतः शाळांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि व्हॅन्स यावर याचा मोठा परिणाम होणार असल्याने काही शाळांनी ऑनलाइन वर्ग घेत सुट्टी जाहीर केली, तर सकाळच्या सत्रातील शाळांनी आपली सुट्टी दीड ते दोन तास लवकर दिली आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बंडगार्डन, काळेपडळ, कोंढवा आणि भारती विद्यापीठ वाहतूक विभागांमध्ये तात्पुरते वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!