समोर तगडे चित्रपट, पण सुभेदार चित्रपटाने मारली बाजी, दोन दिवसात जमवला ‘एवढ्या’ कोटींचा गल्ला…


मुंबई : दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित “सुभेदार” हा त्यांचा शिवराज अष्टकापैकी पाचवा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचून आणताना दिसला.

एकीकडे बॉक्स ऑफिसवर ‘गदर 2’ आणि ‘ड्रीम गर्ल 2’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांची चर्चा असतानाच ‘सुभेदार’ने प्रेक्षकांची गर्दी आपल्याकडे खेचली आहे. या चित्रपटातून सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आला आहे.

हा चित्रपट अगोदर १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र निर्मात्यांनी त्यात बदल करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच्य दिवशी सुभेदाराची भूमिका साकारणारे अजय पुरकर

आपल्या लेकिसह चित्रपट पाहायला आले होते त्यावेळी शेवटचा सिन पाहून त्यांच्या लेकीला अश्रू अनावर झाले होते. तर प्रेक्षकांनी जल्लोष करत चित्रपट आवडला असल्याच्या भरभरून प्रतिक्रिया दिल्या.

‘सुभेदार’ची दोन दिवसांची कमाई –

शुक्रवार- १.०५ कोटी रुपये शनिवार-१.७५ कोटी रुपये एकूण- २. ८० कोटी रुपये

अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे हे शिवछत्रपतींच्या योद्ध्यांपैकी महत्त्वाचे नाव! तान्हाजीरावांच्या नावाशिवाय शिवचरित्र पूर्णच होऊ शकत नाही. पण तान्हाजीराव म्हणजे केवळ सिंहगडाची लढाई नव्हे, तर छत्रपतींच्या स्वराज्याची पायाभरणी करणारे आघाडीचे शिलेदार होते. ‘

सुभेदार‘ हे मुलकी आणि लष्करी दोन्ही प्रकारचे महत्त्वाचे पद. या चित्रपटातून त्यांच्या अतुलनीय शौर्या बरोबरच त्यांच्या प्रशासकीय पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

‘सुभेदार’मध्ये अभिनेते अजय पूरकर यांनी तान्हाजी मालुसरेंची मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटात स्मिता शेवाळे, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

महाराष्ट्रातील ३५० हून अधिक चित्रपट गृहात ९०० पेक्षा अधिक स्क्रीनवर हा चित्रपट दाखवण्यात आला. गेल्या दोन दिवसांत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केलेली पाहायला मिळाली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!