राज्य हादरलं!! ६ वर्षांच्या मुलीवर बाप-लेकाने केला बलात्कार, घटनेने उडाली खळबळ…

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात महिलांच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका सहा वर्षांच्या चिमुरडीवर बाप-लेकानेच लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, पीडित चिमुरडीची आई इतरांच्या घरी घरकामासाठी जात होती. तर, तिचे वडील हातमजुरीचे काम करत होते. शेजारी राहणाऱ्या बाप-लेकाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी बाप-लेकाचा अटक केली आहे.
याबाबत तपास सुरू आहे. पीडितेचे आई-वडील कामाला गेल्यानंतर शेजारी राहणाऱ्या आरोपींनी पीडितेला चॉकलेटचे आमिष दाखवले. त्यानंतर 12 वर्षांचा अल्पवयीन मुलगा आणि त्याचा मजुरी करणाऱ्या बापाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. यामुळे ती खूपच घाबरली होती.
या घटनेनंतर मुलीच्या पोटात दुखू लागल्याने मुलीच्या आईला संशय आला. आईने मुलीला विचारले असता तिने शेजारी राहणाऱ्या बाप-लेकाचे नाव घेतले. तसेच त्यांनी केलेल्या अत्याचाराबाबत सांगितले. यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. सध्या या पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने मात्र सगळेच हादरले आहेत.
पोलिसांनी या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. तसंच, या दोन्ही बाप-लेकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित चिमुरडीची आई इतरांच्या घरी घरकामासाठी जात होती. अशी माहिती समोर आली आहे.