वर्ग 2 जमीनीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांची अनेक दिवसांची मागणी मान्य, काय होणार फायदा?

मुंबई : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. भोगवटा वर्ग 2 आणि देवस्थान इनाम वर्ग 3 या प्रकारातील जमिनी तारण ठेवण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळवताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता.
याबाबत महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्र महसूल अधिनियमानुसार भोगवटा वर्ग २ मधील जमिनी तारण ठेवणे आणि कर्ज थकित झाल्यास त्या विक्री करण्याची कायदेशीर तरतूद आहे. मात्र, बऱ्याच बँकांना या तरतुदींची संपूर्ण माहिती नाही, त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बँकांना यासंबंधी माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे महसूल विभागाने भोगवटा वर्ग 2 जमिनी तारण ठेवण्यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बँका आणि वित्तीय संस्थांना स्पष्ट मार्गदर्शन मिळेल आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया सोपी होईल.
यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या बैठकीत शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी परिपत्रक नव्याने जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतीसाठी आवश्यक भांडवल उभारणे आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ जाणार आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, खासदार नितीन पाटील, तसेच विविध सरकारी आणि वित्तीय अधिकारी उपस्थित होते. याबाबत अनेक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करत होते. अखेर हा। निर्णय झाला आहे.