आता सर्व अर्जदारांना मिळणार शेततळे, राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलं मोठं गिफ्ट….

पुणे : राज्य सरकारने मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली आहे. अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शेततळ्यांचा लाभ देण्यात येतो. यामुळे शेतकऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याच्या टंचाईवर मात करता येते. आता याच योजनेसंबंधी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पूर्वी या योजनेत लॉटरी पद्धत वापरली जात होती. परंतु आता ती बंद केली जाणार आहे. यामुळे सर्वांना फायदा होणार आहे.
आता या योजनेत अर्ज करणाऱ्या सर्वच अर्जदारांना शेततळे दिले जाणार आहे. लाभार्थी शेतकऱ्याला शेततळे मंजूर झाल्यानंतर तीन महिन्यात त्याचे काम पूर्ण करावे, अशी या योजनेची अट आहे.
हे असणार अटी..
या योजनेचा लाभ घेत असणाऱ्या शेतकऱ्याने बॅंक खात्यासोबत आधार प्रमाणीकरण करणे खूप गरजेचे आहे. लाभार्थी शेतकऱ्याला शेततळे मंजूर झाल्यानंतर तीन महिन्यात त्याचे काम पूर्ण करावे, अशी या योजनेची अट आहे.
अनुदान…
या योजनेत अर्ज करण्यापूर्वी हे जाणून घ्या की वैयक्तिक शेततळ्याचे एकूण आठ प्रकार आहेत. त्यासाठी एकूण २० ते ७५ हजारांपर्यंत अनुदान मिळते. सोलापूर जिल्ह्यामधील एकूण ६९० शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यातील २६१ जणांना अनुदान मिळाले आहे. अशातच आता लवकरच उरलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
महत्त्वाची कागदपत्रे लागणार…
जमिनीचा सात-बारा उतारा (शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी ६० गुंठे जमीन पाहिजे)
आधारकार्ड
मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला
बॅंक पासबुक आणि हमीपत्र
कोरोनामध्ये दोन वर्षे ही योजना बंद झाली होती. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह काही आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यावर प्रश्न उपस्थित केले होते. नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला पुन्हा सुरुवात केली.
यामुळे आता याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना पाणी बचत करण्यास मदत होणार असुन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार आहे.