ST Mahamandal : भारीच! लोकांची डोकेदुखी बंद ; खिश्यात पैसे नसले तरी करता येणार लालपरीने प्रवास, जाणून घ्या ..
ST Mahamandal : देशात बऱ्याच लोकांना बस ने प्रवास करावा लागतो. डिझेल आणि पेट्रोल यांचे दर जास्त असल्यामुळे खाजगी वाहनांनी प्रवास प्रत्येकाला परवडत नाही. सुट्टे पैसे नसल्यामुळे बसने प्रवास करणे लोकांना डोकेदुखी असायची. आता मात्र राज्य परिवहन महामंडळाने लोकांची डोकेदुखी, वादावादी बंद करण्याचे काम केले आहे.
तसेस, स्मार्ट फोने आल्यापासून सगळेच लोक ऑनलाईन व्यवहार करत आहे. अशातच आता राज्य परिवहन महामंडळ आता डिजिटल होऊ लागले आहे. पुणे विभागात चौदा आगारात डिजिटल सुविधा सुरु करण्यात आली आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे प्रवाश्यांना आता खिश्यात सुट्टे पैसे आहे कि नाही याची चिंता करण्याची गरज नाही. महामंडळाने मोठ्या शहरामध्ये स्लीपर कोच बस चालू केल्या आहेत.
महामंडळाच्या बसमध्ये आता क्यूआर कोडची सुविधा सुरु केली आहे. यामुळे सुट्ट्या पैशांची समस्या कायमची मिटेल. प्रवाशांना आता महामंडळाच्या निर्णयामुळे ऑनलाईन तिकीट काढून बस प्रवास करता येईल.
तसेच लवकरच कार्ड स्वॅप करुन तिकीट देण्याची सुविधा महामंडळ सुरु करणार आहे. यापूर्वी पुणे शहरात पीएमपीएमएलने ही सुविधा सुरु केली होती. पुणे विभागात १८ ते २० हजार पैसे ऑनलाईनच्या माध्यमातून जमा होऊ लागले आहेत.