SSC 10th Result : अखेर प्रतिक्षा संपली, ‘या’ दिवशी जाहीर होणार दहावीचा निकाल, जाणून घ्या..
SSC 10th Result : बारावीचा निकाल लागल्यावर दहावीचा निकाल कधी लागणार या बाबत प्रतीक्षा होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल २७ मेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १० वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, सर्व मुले आणि मुली अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर निकाल पाहू शकतात आणि निकाल डाउनलोड करू शकतात. SSC 10th Result
बोर्डा कडून बारावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. यानंतर १० वीच्या निकाला बाबत प्रतीक्षा होती. अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ २७ मे रोजी १० वीचा निकाल जाहीर करणार आहे.
ही परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि लातूर विभागांमार्फत घेण्यात आली होती. विभागीय मंडळाने पेपर तपासणी पूर्ण केली आहे.
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कसा पाहणार?
mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा, त्यानंतर होम पेजवर दहावीच्या निकालावर जा, आपले लॉगिन तपशील प्रविष्ट करा, आता तुमचा निकाल उघडेल तपासा आणि डाउनलोड करा.