विशेष रस्ते दुरुस्ती अंतर्गत दौंड तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी २५ कोटींचा भरघोस निधी मंजूर झाला असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली आहे

दौंड : दौंड तालुक्यातील काही रस्त्यांची दुरवस्था झाली होती त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक काही दिवसांपासून आमदार अॅड. कुल यांचेकडे केली होती त्यानुसार आमदार अॅड. राहुल कुल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे पाठपुरावा करून सदर रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळवली आहे.
विशेष दुरुस्ती अंतर्गत मंजूर रस्त्याची कामे पुढील प्रमाणे
१) दौंड ते लिंगाळी ते मळद रस्त्याची विशेष दुरुस्ती करणे – ५ कोटी
२) नानविज ते पोलीस प्रशिक्षण केंद्र ते गिरीम रस्त्याची विशेष दुरुस्ती करणे – २ कोटी ५० लक्ष
३) यवत ते दुधाणे चौक ते पिंपळगाव रस्त्याची विशेष दुरुस्ती करणे – ५ कोटी
४) कोरेगाव भिवर ते मिसाळवाडी ते राहू रस्त्याची विशेष दुरुस्ती करणे – ५ कोटी
५) बोरीबेल ते देऊळगाव राजे रस्त्याची विशेष दुरुस्ती करणे – ५ कोटी
६) केडगाव टोलनाका ते पिंपळगाव रस्त्याची विशेष दुरुस्ती करणे – २ कोटी ५० लक्ष
लवकर या सर्व कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून या कामांना सुरुवात होणार असल्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी यावेळी सांगितले आहे.