पुणे हादरले! भाजी कापण्याच्या चाकूने सपासप वार; प्रेयसीकडून प्रियकराची निर्घृण हत्या
पुणे : प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वाघोली भागात प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडला आहे. समोवारी (ता.२९) सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
यशवंत महेश मुंढे (वय 20 रा. बीड ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनुजा महेश पनाळे (रा अनगर ) असे खून करणाऱ्या तरुणीचे आहे.
मिळलेल्या माहिती नुसार, , हे दोघेही मागील काही महिन्यांपासून वाघोली परिसरात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. या दोघांमध्येही प्रेम संबंध होते. मात्र आज पहाटेच्या सुमारास प्रियकराचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला. संबंधित प्रेयसीने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने प्रियकराच्या सर्वांगावर वार केल्याचे दिसून आले.
प्रियकराला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. संबंधित प्रेयसीही यामध्ये जखमी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.