उद्यापासून आस्मानी संकट, शनिवारी कुठे कुठे मुसळधार? हवामान खात्याचा इशारा काय? जाणून घ्या..

ईशान्य भारतात तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर, हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या 24 तासांत अनेक भागात हवामान पूर्णपणे बदलेल, असे आयएमडीने म्हटले आहे. पुढील 24 तासांत उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे देशात पुन्हा एकदा हवामान बदलणार आहे.
गुजरातमध्ये एक आठवड्यापासून उष्णतेची लाट आहे, आयएमडीने याबद्दल रेड अलर्ट जारी केला होता. वायव्य भारतातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा आजही जारी करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत गुजरात आणि मध्य प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढेल, यामुळे एक पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाला आहे.
त्याचा परिणाम म्हणजे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिलमध्येच अस्मानी संकट येऊ शकतं. दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे. येत्या 24 तासांमध्ये हवामानत अचानक बदल होऊ शकतो. हवामान विभागाच्या सांगण्यानुसार पंजाब, हरियाणा, दिल्ली मध्ये अचानक हवामान बदलू शकतं.
यामुळे उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये ढग बरसून, पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिमी विक्षोभामुळे, पश्चिम आणि उत्तर राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण, गडगडाटी वादळे आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच दिल्ली, पंजाब, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्येही त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. तसेच पूर्व आणि ईशान्य भारतात तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, किनारी आंध्र प्रदेश, यानम, केरळ, माहे, तेलंगणा, कर्नाटक आणि मध्य भारतात वादळासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.