Sindhudurg News : सिंधुदुर्गमध्ये मोठी दुर्घटना, मच्छिमारांची बोट बुडाली, तिघांचा मृत्यू, दाट दुख्यांमुळे घडली घटना…


Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बोट दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे, आचरा समुद्रामध्ये ही दुर्घटना घडली आहे. समुद्रामध्ये मच्छिमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छिमारांची बोट दगडाला आपटली.

या अपघातामध्ये बोटीच्या मालकासह दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण थोडक्यात बचावला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दाट धुक्यामुळे अंदाज न आल्यानं आचरा समुद्रामध्ये मच्छीमारी करणारी बोट दगडाला आपटून अपघात घडला. Sindhudurg News

यामध्ये बोट मालकासह दोघांचा मृत्यू झाला आहे, या बोटीमध्ये चौघेजण होते, चौघांपैकी तिघांचा मृत्यू झाला तर एक थोडक्यात बचावला आहे. या अपघातातून वाचालेला खलाशी पोहून किनारपट्टीवर आला, त्याने घडलेल्या घटनेची माहिती तेथील ग्रामस्थांना दिली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीनं मदतीसाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत तिघाांचा मृत्यू झाला होता. बोट दगडाला जोरात आपल्यामुळे बोट जाग्यावरच बुडाली. ही बोट रविवारी मध्यरात्री बुडाली. तिघांचे मृतदेह सापडले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!