भाऊबीजेच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; खरेदी करण्यापूर्वी आजचे भाव एकदा पाहाच

पुणे : दिवाळीचा सण संपल्यानंतर आता सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी राष्ट्रीय राजधानीतील सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत संकेत आणि अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याचा भाव ५०० रुपयांनी कमी झाला. त्यामुळे सोन्याचा दर घसरून १,४६,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. यापूर्वी सोमवारी ९९.९ टक्के शुद्धतेचे सोने १,४६,९०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते.
दुसरीकडे, सोन्याच्या तुलनेत चांदीचे दर मात्र स्थिर राहिले. स्थानिक व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, सलग दुसऱ्या सत्रात चांदीचा भाव १,९२,५०० रुपये प्रति किलो (सर्व करांसह) या पातळीवर कायम होता. दरम्यान, आजही सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

आजचे कॅरेटप्रमाणे सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – १,४१,७१० रुपये | २२ कॅरेट – १,२९,९०१ रुपये | १८ कॅरेट – १,०६,२८३ रुपये | १४ कॅरेट – ८२,६६४ रुपये.
तुमच्या शहरातील २४ कॅरेट सोन्याचे आजचे दर
मुंबई – १,४१,७१० रुपये | पुणे – १,४१,७१० रुपये | नाशिक – १,४१,७१० रुपये | नागपूर – १,४१,७१० रुपये | कोल्हापूर – १,४१,७१० रुपये | सांगली – १,४१,७१० रुपये | जळगाव – १,४१,७१० रुपये | छत्रपती संभाजीनगर – १,४१,७१० रुपये (प्रति १० ग्रॅम).
सोन्याच्या किमतीतील घसरणीवर तज्ज्ञांचे मत काय?
बाजार तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील नरमाई आणि अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. याशिवाय, दिवाळीच्या काळात सोन्याची खरेदी अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने किमतींना मोठा आधार मिळाला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात हाजीर सोन्याचा भाव २७.५९ डॉलर म्हणजेच जवळपास एक टक्क्याने घसरून ४,११३.५५ डॉलर प्रति औंसवर आला. तर चांदीचा भावही एक टक्क्याहून अधिक घसरून ५२.७७ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होता.
गुंतवणूकदारांचे लक्ष आता जागतिक बाजारातील घडामोडी आणि अमेरिकेच्या आर्थिक आकडेवारीकडे लागले आहे. मुद्रेक्सचे प्रमुख क्वांट विश्लेषक अक्षत सिद्धांत यांच्या मते, अमेरिकेतील महागाईची आकडेवारी जाहीर होण्यापूर्वी कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे महागाईबाबतची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. गेल्या सत्रात एक टक्क्यांची तेजी नोंदवल्यानंतरही सोने ४,१०० डॉलर प्रति औंसच्या आसपास मजबूत स्थितीत टिकून आहे.
अमेरिका आणि इराणमधील संघर्ष संपण्याच्या शक्यतेमुळे मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलचा भाव २.७२ डॉलर म्हणजेच तीन टक्क्यांनी घसरून ८९.८५ डॉलर प्रति बॅरलच्या खाली आला होता.
कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे महागाईची चिंता काहीशी कमी झाली असली, तरी डॉलरमधील चढ-उतार आणि जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम नजीकच्या काळात सोन्या-चांदीच्या दरांवर कायम राहू शकतो. आता गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेच्या महत्त्वाच्या महागाईच्या आकडेवारीकडे लागले आहे. या आकडेवारीतून अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या आगामी व्याजदर धोरणाचे संकेत मिळू शकतात.
