महिलांना घालतीय शॉर्ट कुर्ता आणि बिग बॉटम स्टाइलची भुरळ…

उरुळी कांचन : सलवार कमीज हा प्रत्येक ऋतूत एक हॉट ड्रेस समजला जातो. हा निश्चितच एक पारंपरिक पेहराव आहे; पण सध्या या पेहरावाला आधुनिक रूपही दिलं आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लेटेस्ट ट्रेंडऐवजी जर तुम्ही तुमच्या रंग-रूपानुसार आणि बॉडी शेपनुसार याची निवड केलीत तर ती जास्त सुंदर व स्टाइलिश दिसेल. त्यासाठी या काही महत्त्वाच्या बाबी.
– कुर्ता नेहमी थोडासा लांब असायला हवा. यामुळे तुम्ही उंच दिसता. जर तुमची उंची पाच-सव्वा पाच फूट असेल तर कुर्त्याची लांबी ४७-४८ इंच असावी.
– जर तुमचे खांदे रुंद असतील तर फुग्याच्या बाह्या वापरू नका.
– जर तुमचे दंड जाड असतील तर स्लीव्हलेस कुर्ता घालू नका. जर पाच इंच लांबीच्या बाह्यांचा वापर केलात तर तुमच्या दंडांचा घेर झाकला जाईल व तुम्ही थोड्याशा बारीक दिसाल.
– सलवार कमीज अनेक वेगवेगळ्या स्टाइलमध् घालता येऊ शकते. पण स्टाइल ट्रेंड सतत बदलत असतात. सध्या शॉर्ट कुर्ता आणि बिग बॉटमची फॅशन आहे.
– चुडीदार लांब कुर्त्यावर छान दिसते. शॉर्ट कुर्त्यावर चुडीदार घालणं टाळा. चायनीज कॉलरमुळे तुम्ही खांदे रुंद असतील तर ही स्टाइल करू नका.
– जर तुमचा रंग सावळा असेल तर मरून, लाल, नीळा किंवा करडा हे रंग तुम्हाला छान दिसतील आणि जर तुमचा रंग गोरा असेल तर हिरवा, पिवळा हे रंग उठून दिसतील.
किचनसाठी काही टिप्स..
• कोणत्याही भाजीचा रस्सा दाट करण्यासाठी त्यात थोडेसे मक्याचे पीठ पाण्यात घोळवून मिसळावे.
• पास्ता बनवताना पाणी उकळण्यानतरच त्यात मीठ मिसळावे. यामुळे तो लवकर शिजेल.
• भजी तळताना जर तेलाचा फेस होत असेल, तर त्यात हळकुंडाचा तुकडा टाकावा.
• कांद्याची वरची साल काढून थोडावेळ पाण्यात भिजवल्यास वा फ्रीजमध्ये थंड करून ते चिरल्यास डोळ्यांतून अश्रू येणार नाहीत.
• डोसा कुरकुरीत होण्यासाठी उडदाची डाळ वाटताना त्यात थोड्या मेथ्या मिसळा.