पत्नीला नग्न अवस्थेत नाचायला लावून केले शुटिंग, आणि अनैसर्गिक संभोग करून….; पुण्यातील घटनेनं उडाली खळबळ..

पुणे : पुण्यात एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ब्ल्यु फिल्म दाखवून त्याप्रमाणे अनैसर्गिक संभोग केल्यावर पत्नीला विवस्त्र अवस्थेमध्ये नाचायला लावून त्याचे पतीने शुटिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.
याप्रकरणी समर्थ पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती अशी की, फिर्यादी यांचा २०१५ मध्ये विवाह झाला होता. फिर्यादीचा पती त्यांना अश्लिल चित्रफित दाखवून त्याप्रमाणे अनैसर्गिक संभोग करत होता.
यामुळे पत्नी हतबल झाली होती. तसेच त्यांना विवस्त्र अवस्थेत नाचायला लावत. त्याचे चित्रीकरण करत. त्याला फिर्यादी यांनी विरोध केल्यावर ते शुटिंग व्हायरल करण्याची धमकी देत असे. नंतर पुन्हा तसाच संभोग करत असत.
या घटनेनंतर त्या माहेरी निघून आल्या. तेव्हा घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने फिर्यादीवर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, फिर्यादीची बहिण काम करत असलेल्या ठिकाणी ती सेक्स रॅकेट चालवित आहे, अशा आशयाचे पत्र पाठवून तिची बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत. या घटनेमुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे.