Shocking News : चालत्या बसमध्ये ड्रायव्हरला हार्ट अटॅक, मात्र मृत्युआधी वाचवले ६५ प्रवाशांचे जीव, वाचा घटनेचा थरार..


Shocking News : धावत्या बसमध्ये ड्रायव्हरलाच हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. मात्र, मृत्युआधी ड्रायव्हरने ६५ प्रवाशांचे जीव वाचवले आहे. सुदैवाने या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाहीये. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

एस के आख्तर असे मृत्यु झालेल्या बस ड्रायव्हरचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पश्चिम बंगालमधील ही बस बालासोर जिल्ह्यातील निलगिरी भागातील पंचलिंगेश्वरला जात होती. या बसमधून ६५ प्रवासी प्रवास करत होते. या बसमधून प्रवास करणारे प्रवासी कोलकत्ता येथील होते. बस चालवताना अचानक चालक एस के आख्तर यांना हृदयविकाराचा झटका आला. Shocking News

दरम्यान, यावेळी चालकाच्या छातीत तीव्र वेदना सुरु झाल्या. त्यावेळी ड्रायव्हरने बस रस्त्याच्या बाजूला थांबवली. यानंतर काही वेळातच ड्रायव्हर बेशुद्ध झाला. प्रवाशांनी ड्रायव्हरला जवळच्या रुग्णालयात नेले.मात्र, डॉक्टरांना त्याला मृत घोषित केले.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!