… ची बायको पॉर्नस्टार…!! सोसायटीच्या १४० सदस्यांना धक्कादायक मेल, पुण्यातील घटनेने उडाली खळबळ…

पुणे : पुण्यात कोंढवा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आहे. सोसायटी मध्ये राहणाऱ्या एका महिलेबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत एक मेल चक्क सोसायटीच्या १४० सदस्यांना पाठवण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कोंढवा भागात असणाऱ्या सोसायटीमध्ये एका महिलेला पॅार्नस्टार म्हणत विनयभंग करण्यात आला. महिलेच्या नावाने मेल गेल्याचे महिलेला कळाल्यानंतर या प्रकरणी महिलेने तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, कोंढवा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या आरोपी शेखर धोत्रे याने ई-मेलवरून एका व्यक्तीच्या पत्नीचा आक्षेपार्ह शब्दात उल्लेख केला. “जोशीची बायको पॉर्नस्टार सारखी दिसतेय, आज चालायला आली नाही का”, असा ई- मेल सोसायटीमधील १४० सदस्यांना पाठवून दिला.

महिलेला आणि तिच्या पतीला ही बाब समजल्यानंर महिला आणि तिचा पती या संदर्भात जाब विचारण्यास गेले. जाब विचारायला गेले असता आरोपीने त्यांना धमकी दिली आणि जे करायचं ते कर असं धमकावले. त्यानंतर हा सगळा प्रकारानंतर कोंढवा पोलिसात धाव घेतल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, तक्रारदार महिलेच्या पतीसह झालेल्या वादानंतर आरोपीने बदला घेण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यानंतर महिलेने तात्काळ पोलिस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.