स्वारगेट बलात्कार प्रकरणी दत्तात्रय गाडेबद्दल चौकशीतून हादरवणारी माहिती समोर, पोलिसांची कपडे घालून…

पुणे : काही दिवसांपूर्वी स्वारगेट एसटी स्थानकात एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. नंतर आरोपी दत्तात्रय गाडेला गावच्या शेतातून अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी 13 पथक स्थापन केली होती. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी तंत्रज्ञानाचा आधार घेतला.
याबाबत सध्या आरोपी दत्तात्रय गाडेची चौकशी सुरु आहे. आता चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात वावरत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांचा गणवेश परिधान केलेले दत्तात्रय गाडेचे छायाचित्र पोलिसांना मिळाले आहे. यामुळे तो नेमकं काय करतोय, याबाबत पोलीस तपास करत आहेत. शिवाजीनगर, स्वारगेट, अहिल्यानगर, सोलापूर, तसेच शिरूर एसटी स्थानकात त्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे.
त्याने आणखी अनेक गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्याविरुद्ध तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळेयेणाऱ्या काळात अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. सध्या स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या बलात्कारानंतर बस स्थानकांमधील सुरक्षिततेचा प्रश्च चर्चेत आला. याबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘एसटी’ महामंडळाच्या बस स्थानकांचे सुरक्षाविषयक लेखापरीक्षण करण्यासाठी समिती स्थापन करून सात दिवसांत अहवाल देण्यास सांगितले आहे.