साताऱ्यातील धक्कादायक घटना! शाळेत गेलेले बहीण-भाऊ घरी परतलेच नाहीत, घडलं विपरीत…

सातारा : उरमोडी कॅनॉलमध्ये बुडून एका चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खटाव तालुक्यातील शिरसवडी गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.
इंगळे आणि सात वर्षांचा सत्यम उर्फ गणू शिवाजी इंगळे अशी दोघांची नावं आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, शिरसवडी येथील शिवाजी नानू इंगळे यांची ही दोन मुले दररोज शिरसवडीहून गोपूजवाडा इथे शाळेत जातात. सत्यम इयत्ता दुसरीत, तर रिया अंगणवाडीत होती. नेहमीप्रमाणे ते दोघेही शाळेत गेले; मात्र शाळा सुटूनही घरी परतली नाहीत.
त्यामुळे कुटुंबियांना काळजी वाटू लागली. त्यांनी तातडीनं मुलांना शोधायला सुरुवात केली. सुरुवातीला कुठे खेळायला गेली का याचा शोध घेतला. मात्र कुठेच न दिसल्यानं टेन्शन वाढले.
कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, पण मुलांचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. काही वेळाने उरमोडी कॅनॉलमध्ये रियाचा मृतदेह आढळला. हे पाहून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. पण अजूनही सत्यमचा शोध लागला नव्हता.
दरम्यान, रिया सापडल्यानंतर पोलिस, ग्रामस्थ आणि प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली. अखेर दुसऱ्या दिवशी सत्यमचा मृतदेह गोपूज हद्दीतील आरे नावाच्या शिवारात आढळून आला. गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
अपघाताने ते दोघे कॅनॉलमध्ये पडले की अन्य काही कारण होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. एका क्षणात कुटुंबातील दोन गोंडस जीव निघून गेल्याने इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या धक्क्यातून बाहेर पडणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान आहे.